शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:47 IST

वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.

ठळक मुद्देखेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडेखांबतळेतील मंदिराचा गाभारा पाण्याने भरला

खेड : वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.रोहिणी आणि मृग कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आर्द्रा नक्षत्रात लावणीकामासाठी लागणारा कोकणातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यास वरुणराजा प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल, अशी हिंदू धर्मात धारणा आहे. पावसाचे आगमन लांबल्यास देशभरात विविध मंदिरांचे गाभारे पाण्याने भरण्याची पद्धत आहे.

शंकर मंदिरात परिसरातील महिला, पुरुषांनी महादेवाच्या पिंडीचा गाभारा पाण्याने भरुन पाऊस पडण्यासाठी वरूणराजाला साकडे घातले. शहरातील खांबतळे येथील शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरून पावसासाठी देवालाच साकडे घालण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तालुका अध्यक्षा राजश्री पाटणे, शहर अध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, मनाली पावसकर, भरणे ग्रामपंचायत सरपंच ललिता चिले, नंदू साळवी, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश धारीया, खेड तालुका अध्यक्ष पुष्पेन दिवटे, शहर अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपशहर अध्यक्ष सिध्देश साळवी, दादु नांदगावकर, गणेश सुर्वे, कौशल चिखले, अविनाश माने, संतोष पवार व खेड शहरातील नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी