शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चिपळूण तालुक्यात ‘मनरेगा’चा धडाका

By admin | Updated: November 12, 2015 00:03 IST

लाखोंचा खर्च : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

अडरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यात २८० कामे पूर्ण झाली असून, त्यात २ हजार ८४४ मजुरांनी काम केले आहे. या कामांसाठी एकूण ४९ लाख ६४ हजार ७३७ रुपये खर्च झाला आहे. चिपळुणात मनरेगा योजनेअंतर्गत विविध कामांनी सध्या वेग घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. कामासाठी लागणारा मजूरही आता उपलब्ध होऊ लागल्याने अनेक कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येते. मात्र मजुरांना मिळणारी मजुरी ही अनियमित मिळत असल्याची ओरड सुरु आहे.सन २०१५-१६च्या एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये विहिरी ३३, गाळ काढणे १२, रस्ता करणे ७४, शौचालय बांधणे ३, संरक्षक भिंत ८, जनावरांचा गोठा १०७, शेळीपालन शेड ९, कुक्कुटपालन शेड १८, फळबाग लागवड १६ अशी एकूण २८० कामे झाली असून, त्यात २ हजार ८४४ मजुरांनी १५ हजार ३४२ दिवस काम केले आहे. या विकासकामांवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना १ लाख ७३ हजार ३९६ इतके मानधन देण्यात आले. ग्रामीण भागातील बेरोजगारांना या योजनेमुळे रोजगार मिळत आहे. एप्रिल ते आॅक्टोबरअखेर मजुरीपोटी ३० लाख ३६ हजार २८५ रुपये खर्ची पडले आहेत, तर साहित्यापोटी १७ लाख ५५ हजार ५६ रुपये खर्ची पडले आहेत. शासनाच्या डीएससी सध्या बंद असल्यामुळे त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. वेळेवर डीएससी देऊन तालुक्यातील ग्रामस्थांना मजुरीचे व साहित्याचे पैसे लवकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याप्रकरणी लक्ष घालावे आणि मजुरी वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)मजुरांची नाराजीमजुरांना मजुरीबरोबरच त्यांनी या कामासाठी वापरलेल्या साहित्याचे पैसेही वेळेत उपलब्ध होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.रत्नागिरी जिल्हा : प्रतिसादात हळूहळू थंडावाजिल्ह््याच्या अन्य भागातही कमी अधिक प्रमाणात या योजनेला मजूर उपलब्ध होतात. परंतु, त्यांची मजुरी शासनाकडून वेळेत उपलब्ध होत नसल्याने या योजनेला हळूहळू थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.