चिपळूण : महापुरामध्ये चिपळूण शहर वेढले गेले होते. त्याचवेळी तालुक्यातील अनेक गावांवरही मोठे संकट आले होते. यातून सावरण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील मिळून एकूण ६८२ कातकरी कुटुंबांना आमदार शेखर निकम यांनी मदतीचा आधार दिला आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ठिकाणी दरड कोसळली, पूल खचले, तसेच रस्ते वाहून गेल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. प्राथमिक सोयी-सुविधांपासूनही ग्रामस्थ वंचित राहू लागले होते. त्याची दखल आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातील केतकी, कोळकेवाडी, कोंढे, पोफळी, कुंभार्ली, शिरगाव, अलोरे, मुंढे, कळकवणे, कोंडावळे, निरबाड़े, दळवटणे, आकले, पिंपळी, नागावे, तिवरे, गाणे, नांदिवसे, ओवळी, कालुस्ते, पेढांबे, कुटरे, कादवड या गावांतील कातकरी बांधवांच्या एकूण ६८२ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य स्वीय सहायक रूपेश इंगवले यांच्यामार्फत केले. यावेळी रमेश राणे, प्रकाश पवार, शशिकांत निकम, नीलेश निकम, नीलेश कदम, माया महाडिक उपस्थिती होत्या.