शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

साखरपा येथील घटनेने संगमेश्वरात खळबळ

देवरुख : अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिला कणकवली येथे पळवून नेले व पाच महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार या मुलीच्या आईने देवरुख पोलीस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे.गजानन लिंगायत (वय ४५, साखरपा, गुरववाडी) असे या प्रौढाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गजानन लिंगायत याने २९ मे ते २९ आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. कणकवली बाजारपेठ (सिंधुदुर्ग) या ठिकाणी नेऊन त्या प्रौढाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वीच या मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात दिली होती. शोधाशोध सुरू असतानाच या नातेवाइकांना गणेश लिंगायत यांनी मुलीला कणकवली येथे नेऊन ठेवल्याची कुणकुण लागली. त्यानंतर नातेवाइकांनी कणकवली येथे धाव घेऊन मुलीला साखरपा येथे आणले. त्यानंतर या मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.याप्रकरणी लिंगायत याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (१) तसेच लैंगिक अत्याचार २०१२ चे कलम (अ) ४/५, (एल) (एन)६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे.याप्रकरणी तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सखाराम नागले, हेड कॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे करीत आहेत. (प्रतिनिधी)