लोकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर असतानाच रविवारी सकाळी ९
वाजून १० मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साडवली परिसराला
भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का विशेषकरून इमारतीत उंच ठिकाणी राहणा-या नागरिकांना अधिक जाणवला.
तौक्ते
चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातावरणात काहीसा बदल झाला आहे. वादळानंतर
अनेक ठिकाणी पावसाचा जोर आहे. तर, काही वेळा कडकडीत ऊन पडत आहे. मात्र,
रविवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील काही भागांत भूकंपाचा धक्का बसल्याने
नागरिक घाबरून गेले होते. पण, सौम्य धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
काही
घरांत भांडी ठेवण्याचे रॅक हलल्याने भांड्यांच्या आवाजाने नागरिकांना भूकंप
झाल्याची जाणीव झाली. तर, काहीजण झोपेत असताना बेड हलल्याने भीतीने जागे
झाले. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरिकांना जाणवला.