शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

चिपळूणकरांसाठी '२६ जुलैच्या आठवणींही थरकाप उडवणाऱ्या

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:52 IST

पावसाचे थैमान सुरूच, पुन्हा पुरसदृश्य स्थिती, प्रशासन अलर्ट मोडवर

चिपळूण: मागील आठवड्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा येथे मुसळधार पावसाने थैमान घातले. वाशिष्ठी व शिवनदीने इशारा पातळी गाठल्याने व बाजारपूल परिसरात पाणी शिरल्याने येथील व्यापारी व  नागरिक धास्तावले. परंतू दुपारच्यावेळी ओहोटीला सुरवात झाल्याने काही तासातच पाणी ओसरले. मात्र सायंकाळी ४ वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि चिपळूणकरांच्या अक्षरशः '२६ जुलै २००५'च्या आठवणी ताज्या झाल्या. या संपुर्ण परिस्थितीवर प्रशासन व एनडीआरएफचे पथक सायंकाळी उशीरा पर्यंत लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसापासून चिपळूणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. प्रत्येक विभागात बोटी व अन्य साहित्यांसह पथकही तैनात केले होते. त्यातून शहरात भीती जावून नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली होती.दरम्यान एक दिवस पावसाने विश्रांती घेऊन उघडीप घेतली होती. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच  पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आणि पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. परंतु ओहोटीमुळे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली नव्हती. वाशिष्ठीची इशारा पातळी ५ मीटर असून धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मंगळवारी दुपार पर्यंत ४.६५ मीटर इतकीच पातळी राहिली. त्यावेळी बाजार पुलाजवळील मच्छी मार्केट  व नाईक कंपनी परिसरात काहीसे पाणी शिरले होते. नंतर लगेचच ते ओसरले. अठरा वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने २५ जुलै २००५ ला जोरदार पाऊस सुरु झाला आणि '२६ जुलै'ला महापुराने शहरात हाहाकार घातला. चिपळूणकरांच्या त्याच आठवणी २६ जुलैच्या पूर्वसंध्येला ताज्या झाल्या. मंगळवारी ३५ रोजी पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज करून आपत्ती निवारण पथके यंत्रसामुग्रीसह तैनात केली आहेत. बाजारपुल व अन्य ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. शहरात रिक्षा फिरवून सतर्कतेचे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात होते. सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालया समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्या पाण्यातून मार्ग काढताना वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर लक्षात घेत येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली. 

पावसाची दोन हजारी पार....  गेल्या २४ तासात येथे सकाळी ८ वाजेपर्यंत  १०५ मीली मीटर पाऊस झाला. आतापर्यंत एकूण १९१३.९७ मीली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणात पावसाने दोन हजार मिली मीटरचा टप्पा पार केला. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी कमी कालावधीत यावर्षी अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूर