शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे सदस्यांनी सभा गाजवली

By admin | Updated: March 9, 2017 23:49 IST

जिल्हा परिषद सभा : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

रत्नागिरी : पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आज (गुरुवारी) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सभेत सदस्यांमध्येही वादावादी झाल्याने आजची सभा गाजली. आमदारांवर केलेल्या टीकेमुळे जोरदार वादंग झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व वित्त सभापती विलास चाळके, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर, सदस्य उदय बने, अजित नारकर, रचना महाडिक, अस्मिता केंद्रे, स्वरुपा साळवी, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कारप्राप्त खेड तालुक्यातील पोयनार ग्रामपंचायतीला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष गोलमडे व पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. गेली पाच वर्षे मंडणगड तालुक्यातील बससेवेबाबतचा प्रश्न अजून सुटलेला नसल्याने सदस्या अस्मिता केंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. राजापूरचे गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही जोरदार चर्चा झाली. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांचा धीर चेपल्याने सभेला बिनदिक्कतपणे अनुपस्थित राहात आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी सदस्य अजित नारकर, नंदकुमार मोहिते, बाबू म्हाप, बाळकृष्ण जाधव, अस्मिता केंद्रे यांनी केली. सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असा आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर आणि जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी देऊनही ते सातत्याने गैरहजर राहात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील आमदार अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित का करीत नाहीत, असा प्रश्न नंदकुमार मोहिते यांनी उपस्थित केला. या सभेचा संबंध आमदारांशी जोडू नका, तुम्ही कधी आमदारांना याबाबत लेखी निवेदन दिलेत का, असा प्रश्न म्हाप यांनी मोहितेंना केला. मोहिते यांनी आमदारांवर केलेल्या टीकेबद्दल म्हाप, नारकर, बने हेही त्यांच्यावर आक्रमक झाले. बने यांनी मोहिते यांना आमदारांबद्दलचा शब्द मागे घेण्यास सांगितला. मात्र, मोहिते ठाम राहिले. अधिकारी उपस्थितीत राहात नसतील तर वेगवेगळे पर्याय आहेत, अशा शब्दात नारकर यांनी वर्षभर मिळत नसलेल्या न्यायाबद्दल सुनावले. यावेळी अस्मिता केंद्रेही आक्रमक झाल्या होत्या. (शहर वार्ताहर)