शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

राजापूर नगराध्यक्षपदी मीना मालपेकर

By admin | Updated: November 22, 2015 00:01 IST

राष्ट्रवादीचा पराभव : चमत्कार घडवण्यात युतीला अपयश

राजापूर : शह काटशह, कुरघोड्या आणि फोडाफोडीच्या राजकारणावर मात देत काँग्रेस आघाडीच्या नगरसेविका मीना मालपेकर यांनी राजापूरचे नगराध्यक्षपद पटकावले. युती पुरस्कृत राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांचा त्यांनी सात विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. राजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात मतदान घेण्यात आले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेना-भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजापूरचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी काम पाहिले. राजापूर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडीतर्फे मीना मालपेकर उभ्या होत्या. त्यांच्याविरुद्ध शिवसेना-भाजप युतीने मूळ राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या व काहीशा शिवसेनेकडे सरकलेल्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनाच निवडणूक रिंगणात उतरवले. राजापूर नगर परिषदेत एकूण १७ पैकी सर्वाधिक दहा नगरसेवक काँग्रेसचे असून, यापूर्वी त्यातील चौघांना न्यायालयीन प्रक्रियेतून मतदानाच्या हक्कापासून बाद ठरविण्यात आल्याने काँग्रेसचे सहा व मित्रपक्ष राष्ट्रवादीचा एक असे सात संख्याबळ आघाडीकडे होते, तर विरोधकांकडे युतीचे पाच व राष्ट्रवादीच्या नगरसेविका खडपे असे संख्याबळ सहा एवढे होते. फक्त एकाच मताचा फरक असल्याने चुरस वाढली होती. गेले काही दिवस नवनवीन चर्चांना उधाण येत होते. आघाडीतील गळाला लागलेल्या नगरसेवकांच्या नावांची चर्चासुद्धा दबक्या आवाजात सुरू असल्याने प्रत्यक्ष सभागृहात काय घडणार, याबाबत केवळ राजापूर शहरच नाही तर जिल्ह्यात सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात राजापूरच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका व उमेदवार प्रतीक्षा खडपे यांच्या नावाची पुकारणी होताच स्वत: खडपे यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रतोद अभय मेळेकर, श्रद्धा धालवलकर, अपूर्वा मराठे, भाजपच्या शीतल पटेल व मराठे अशा सहाजणांनी आपला हात उंचावून मतदान केले. त्यानंतर आघाडीच्या उमेदवार मीना मालपेकर यांच्या नावाची घोषणा होताच स्वत: उमेदवार मालपेकर यांच्यासहीत उपनगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, स्नेहा कुवेस्कर, वैशाली मांजरेकर, मुमताज काझी, सुलतान ठाकूर व राष्ट्रवादीचे संजय ओगले अशा सातजणांनी आपला हात उंचावून मतदान केले व एका मताने काँग्रेस आघाडीच्या मीना मालपेकर राजापूरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. या निर्णयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जवाहर चौकात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर मीना मालपेकर यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी तेथे विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे युवकचे राज्य उपाध्यक्ष अजित यशवंतराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यासह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नूतन नगराध्यक्षा मीना मालपेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जवाहर चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा मालपेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी आघाडीच्यावतीने फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)