शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:16 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.

ठळक मुद्देहापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

रत्नागिरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.कृषी पणन मंडळ, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि. व भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बंगळुरू यांच्या विद्यमाने हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय आयरे, माजी सभापती मधुकर दळवी, रत्नागिरी आंबा उत्पादक संघाचे प्रकाश साळवी, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि.चे व्यवस्थापक विनोद कुमार, विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल आणि कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

सन २०१४मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अर्क साका निवारक हे औषध तयार केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे समाधान झाले असून, फळाची उत्तम गुणवत्ता मिळतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.साका निवारण्याची पध्दतसाका निवारणाच्या दोन पध्दती आहेत. त्यामध्ये एक फवारणीद्वारे, तर दुसऱ्या पध्दतीत फळ द्रावणात बुडविण्यात येते. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटापर्यंत नवे साधन विकसित करण्यात आले आहे. उर्वरित उंचीच्या झाडांसाठी फवारणीद्वारे औषधांचा वापर करता येणार आहे. साकामुळे वाया जाणाऱ्या आंब्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी