शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निव्वळ आवाजावरच खेळला ‘त्यां’नी क्रिकेट स्पर्धेतील सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:39 IST

अरुण आडिवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. अंगाने सुदृढ असणारी सर्वच मुलं ...

अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. अंगाने सुदृढ असणारी सर्वच मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. पण अंध मुलांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, असे सांगितले तर तुम्हाला खरे वाटेल का? पण रत्नागिरीतील क्रीडांगणावर रविवारी अंध मुलांनीही क्रिकेटचा सामना खेळून आम्हीही काही कमी नसल्याचे दाखवून दिले.क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लार्इंड आॅफ महाराष्ट्र यांच्यातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात निमंत्रित अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील अंध मुलांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरी आणि रायगड या दोन संघांमध्ये हा सामना खेळविण्यात आला.या सामन्याच्यावेळी संस्थेचे सचिव रमाकांत साटम, खजिनदार दादाभाऊ कुटे, प्रशिक्षक अजय मुनी, आस्था फाऊंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे, विशाल मोरे, रूपेश पाटील उपस्थित होते. या सर्वांनी या खेळाडूंना प्रोत्साहन दिले.केवळ आवाजाच्या सहाय्याने ही मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होती. क्रिकेट स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंसह इतरांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. या सामन्याचे समालोचन करण्याचेही काम हीच मुलं करत होती. क्रिकेटसाठी वापरण्यात येणारा चेंडू विशिष्टप्रकारे तयार केला जातो. सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या चेंडूमध्ये छरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे तो खाली पडताच त्याचा आवाज येतो आणि मग हा चेंडू बॅटच्या सहाय्याने पटकावला जातो. क्रिकेट सामन्यात सहभागी होणाऱ्या मुलांचे बी १, बी २, बी ३ असे वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणानुसार त्यांचा संघात समावेश करण्यात येतो.तसेच त्यांची नावे कळण्यासाठी त्यांच्या टी - शर्टवर क्रमांक टाकलेले असतात. त्या क्रमांकानुसार त्या खेळाडूचे नाव कळते. हा खेळ पूर्णत: आवाजावर खेळला जात असल्याने तसेच प्रशिक्षण त्यांना दिले जाते. चेंडूमध्ये छरा टाकून तो आवाज त्यांच्या ओळखीचा केला जातो. त्यामुळे चेंडू जमिनीवर पडताच त्याकडे सर्वांचे लक्ष जाते. तसेच खेळासाठी तयार करण्यात आलेले स्टंप हे ‘मेटल’चे तयार केलेले असतात. या स्टंपला बेल्स एकत्रित अडकविलेल्या असतात. यष्टीरक्षक त्यांना हात लावून विशिष्ट आवाज देतो. त्यानंतर यष्टीरक्षक ‘रेडी’ असे सांगतो आणि मग गोलंदाज ‘तयार’ असे सांगतो. त्यावेळी फलंदाज तयार म्हणताच गोलंदाज चेंडू टाकतो. हा चेंडू बॅटने मारताच त्या दिशेने खेळाडू धावत सुटतात. केवळ आवाजाच्या दिशेने ही मुले खेळताना पाहून त्यांचे कुतूहल वाटते. शिवाय तेही या खेळाचा आनंद लुटताना दिसतात. मग उन्हाचीही पर्वा ते करताना दिसत नाहीत. या सामन्यातून अंधांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळांडूंची निवड करण्यात येणार आहे.