शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमर रहे! शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By संदीप बांद्रे | Updated: April 4, 2023 17:44 IST

भारत -चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भुसख्लनात जवान अजय ढगळे शहीद झाले.

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज त्यांचे मूळ गावी चिपळूण तालुक्यातील मोरवणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहीद सुभेदार अजय ढगळे यांची अंत्ययात्रा बहुदूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत काढण्यात आली. यावेळी पोलिस दलाचे स्काऊट देखील अंत्ययात्रेसोबत होते.अंत्यसंस्कारच्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी ढगळे यांच्या परिवाराची  भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शहीद सुभेदार ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहत ढगळे परिवाराचे सांत्वन केले.108 इंजिनिअर रेजिमेंटचे लेफ्टनन्ट कर्नल रोशन चव्हाण, मेजर शिवकुमार एस.एन.,२ STC पणजी गोवा  सुभेदार जे. आलम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, उपविभागीय अधिकारी चिपळूण प्रवीण पवार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, संचालक सैनिक कल्याण विभाग यांच्यावतीने दीपक मोरे यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजंली वाहिली. तर उपस्थित इतर मान्यवरांकडून व जनसमुदायांकडून पुष्पचक्र व पुष्पहार पार्थिवावर अर्पित करण्यात आले. यावेळी पोलीस दल आणि सैन्यदल यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना प्रत्येकी तीन फेऱ्यांची (फायर) करुन सलामी दिली. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या वीरपत्नी अनुजा अजय ढगळे यांना राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुर्पूत करण्यात आला. शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या अंत्ययात्रेला व अंत्यसंस्काराला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.भारत -चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भुसख्लनात जवान अजय ढगळे शहीद झाले. त्यांचे पार्थिव काल, सोमवारी रत्नागिरी येथे आणण्यात आले होते. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या मोरवणे गावी पार्थिव आणले. शहरातील बहाद्दूरशेखनाका येथून सजवलेल्या लष्करी वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. चौका-चौकात श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेत अमर रहे, अमर रहे, अजय ढगळे, अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर बहादूरशेखनाका येथून कळबंस्ते ते मोरवणे मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीक जमले होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी