शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अपत्यप्राप्तीसाठी विवाहितेला वेताच्या काठीने बेदम मारहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अटकेत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील ऊर्फ पाटील बुवाच्या अनेक लीला उघड होत आहेत. अपत्यप्राप्तीसाठी या बुवाने वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार करीत एका महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. या महिलेला बुवाविरोधातील प्रकरणात साक्षीदार बनविले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : अटकेत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील ऊर्फ पाटील बुवाच्या अनेक लीला उघड होत आहेत. अपत्यप्राप्तीसाठी या बुवाने वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार करीत एका महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. या महिलेला बुवाविरोधातील प्रकरणात साक्षीदार बनविले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पाटील बुवाविरोधात चार वर्षांपूर्वीही झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथील स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार आघाडी उघडली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांकडून सहकार्य मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसे निवेदनही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले आहे. पहिल्यांदा शिवीगाळ करून अर्वाच्य भाषा वापरल्याच्या महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पाटील बुवाला अटक झाली.जामिनावर मुक्तता झाल्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी स्वत:च पाटील बुवाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे दुसºयांदा पाटील बुवाला अटक झाली. २८ सप्टेंबरपर्यंत या बुवाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या पाटील बुवाच्या कारनाम्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. आता आणखी गंभीर गुन्हा दाखल झाल्यास पाटील बुवाला २८ सप्टेंबरनंतर तिसºयांदा अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्याच्या खास सेवेकºयांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असून त्यातील काही आक्रमक सेवेकºयांना अटक होण्याची शक्यता आहे.घराबाहेर न पडण्याचा बुवांचा आदेशपाटील बुवाने एका विवाहितेला अपत्यप्राप्तीच्या उपचाराअंतर्गत वेताच्या काठीने बेदम मारहाण केली तसेच तिने आपल्या घराबाहेर येऊ नये, असा अजब आदेश दिला होता, अशी संबंधित महिलेची तक्रार आहे. त्याबाबत तिने पोलिसांना माहिती दिली आहे.मात्र, याप्रकरणी तिच्या घरच्यांकडून तक्रार दाखल होण्यास विलंब होत आहे. या महिलेने सोमवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रसारमाध्यमांनाही याबाबतची माहिती दिली.कारवाईकडे लक्षपोलीस कोठडीत पाटील बुवाला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस खात्यातील एका महिलेने बुवांना दोनदा लोटांगण घातले. याप्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबाबतची तक्रारही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली जाणार आहे.