शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

मार्लेश्वरचा रमणीय धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

By admin | Updated: July 30, 2014 23:52 IST

पावसाळ्यात गर्दी : श्रावणात परिसराने पांघरला हिरवा शालू

मार्लेश्वर : संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे व श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्री असणारा धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पांढरा शुभ्र फेसाळणारा हा धबधबा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत असून, पर्यटकांना खुणावत आहे.संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एका गुहेमध्ये मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. त्यामुळे या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यातच मार्लेश्वर भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. देवस्थानच्या सभोवताली असलेले उंचच उंच ताशीव कडे सध्या पावसाळा असल्याने हिरवाईने नटले आहेत. त्यांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे की काय, असे पाहिल्यावर वाटते.मार्लेश्वर देवस्थान हे एका गुहेमध्ये वसले असून, ते स्वयंभू आहे. त्यामुळे मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दरदिवशी तीर्थक्षेत्री येत असतात. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे राज्य शासनाने ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले असल्याने येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात व येथील अल्हाददायक वातावरणात अक्षरश: आपले भान हरपून जाते. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य म्हणजे पर्यटकांसाठी वेगळी पर्वणीच असते. निसर्गसौंदर्य न्याहाळताना कड्यातून वाहत येणारे छोटे छोटे धबधबेही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.तीर्थक्षेत्री असणाऱ्या बऱ्याच पायऱ्या सर करुन मार्लेश्वर मंदिरस्थळी गेल्यावर समोरच असणारा पांढराशुभ्र फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविक व पर्यटकांचे जणू स्वागतच करीत आहे, असे वाटते. सध्या हा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या धबधब्याचे मनमोहन रुप पर्यटक आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहेत. मार्लेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर भाविक व पर्यटक धबधब्याचे रुप बऱ्याचवेळा न्याहाळत असतात. काही हौशी पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये धबधब्याचा फोटो काढण्यात दंग असतात. धारेश्वर धबधबा व येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पर्यटकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळतो. उंच कड्यावरुन कोसळणारा धबधबा पाहताना व सभोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेताना पर्यटक एका वेगळ्याच विश्वात तल्लीन होऊन जातात. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने धबधबा व निसर्गसौंदर्याची मजा लुटण्यासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पर्यटकांचा ओघ वाढत आहे. (वार्ताहर)