शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

अनेक सुरक्षा एजन्सीज विनापरवाना ?

By admin | Updated: May 25, 2016 00:31 IST

अनेक सुरक्षा एजन्सीज्ची पोलीस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.

सुनील आंब्रे --आवाशी -खेड तालुक्यात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणाऱ्या रासायनिक कंपन्यांसह अन्य कंपन्यांना सुरक्षा देणाऱ्या अनेक सुरक्षा एजन्सीज् परवानाधारक नसल्याची माहिती समोर येत आहे. यातील अनेक सुरक्षा एजन्सीज्ची पोलीस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लि. कंपनीत एका सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात दोघेजण ठार झाले. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला. याबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सुरक्षा एजन्सीज्बाबत पोलीस खात्याकडून माहिती घेतली होती. त्यानुसार जिल्ह्यात केवळ १४ कंपन्यांचे ५०० सुरक्षारक्षक परवानाधारक असल्याचे स्पष्ट झाले होते. अनेक सुरक्षा एजन्सीज् आपली नोंद स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये करत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. मात्र, इतका मोठा प्रकार होऊनही उर्वरित एजन्सीज्बाबत माहिती घेण्याच्यादृष्टीने कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.खेड तालुक्यातील लोटे-परशुराम या संवेदनशील व रासायनिक प्रकल्प असलेल्या परिसरातही अशीच स्थिती आहे. येथे असणाऱ्या सुरक्षा एजन्सीज्पैकी मे. सुर्वे ग्रुप, धामणदेवी, खेड या एकाच एजन्सीचे नाव परवानाधारकांच्या यादीमध्ये आहे. लोटे पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार केवळ १० एजन्सीजची नोंद लोटे पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आलेली आहे. या परिसरात आणखीही अनेक एजन्सीज् कार्यरत असून, उर्वरितांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही. विशेष म्हणजे सुरक्षा एजन्सीज्सह कंपन्यांनी स्वत:ही याची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, कंपन्यांनीही याबाबत पुढाकार घेतला नसल्याचे दिसत आहे.