शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या रस्ते हस्तांतरण प्रस्तावात अनेक गौडबंगाल

By admin | Updated: July 16, 2017 18:24 IST

शहरातील दारु दुकाने वाचवण्यासाठी खोट्या व बेकायदेशीर गोष्टींचा आधार

आॅनलाईन लोकमत/शिवाजी गोरे दापोली (जि. रत्नागिरी), दि. १५ : न्यायालयाच्या राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील २५० मीटर व ५०० मीटर अंतराच्या आतील दारु दुकाने बंद करण्याच्या निर्णयाला पळवाट म्हणून दापोली नगरपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव केवळ दोन महिन्यात घाईगडबडीत मंजूरही झाला. परंतु, सादर केलेल्या या प्रस्तावात अनेक धक्कादायक बाबी असल्याची चर्चा होत असून, शहरातील दारु दुकाने वाचवण्यासाठी अनेक खोट्या व बेकायदेशीर गोष्टींचा आधार घेण्यात आल्याची जोरदार चर्चा दापोली शहरात रंगली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार दापोली शहरातील सर्व बिअरबार, परमीट रुम, देशी दारुची दुकाने बंद झाली होती. परंतु, राज्य मार्गासाठी २५० मीटर अंतरची अट लागू केल्याने शहरातील एक देशी दारु दुकान नव्या अटीनुसार चालू झाले. मात्र, शहरातील इतर दुकाने बंद झाल्याने चक्क न्यायालयाच्या आदेशाला पळवाट काढण्यासाठी दापोली नगर पंचायतीतील तत्कालिन कमिटीने २००२साली ग्रामपंचायतीचे रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करण्याच्या केलेल्या ठरावाचा आधार घेत दारुबंदीच्या आदेशानंतर तब्बल १५ वर्षांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेले रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव दाखल झाला. परंतु, हा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी अनेक खोट्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी विद्यमान कमिटीला विश्वासात घेऊन २००२च्या ठरावावर चर्चा करुन प्रस्ताव सादर करायला हवा होता. याबाबतचे दापोली नगरपंचायतीकडून नोटिफिकेशनही झालेले नाही. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याकडील रस्ते हस्तांतरीत करण्यासाठी ९ मे २००२ च्या सभेतील इतिवृत्ताचा आधार घेतला जात आहे. त्यावेळी अशाप्रकारचा कोणताही ठराव हेतूपूर्वक झाला नव्हता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. २६ मार्च १९९९ रोजी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीकडील रस्ते नगपंचायतीकडे वर्ग करुन मिळावे, या उद्देशाने त्यावेळी ठराव करण्यात आला होता. परंतु, त्या ठरावाचा चुकीचा अर्थ काढून शहरातील दारु दुकाने वाचवण्यासाठीच या ठरावाचा खोटा आधार घेतला जात आहे. हे काम करण्यासाठी प्रोसिडिंगमध्ये बदल केला असण्याची शक्यता आहे.