शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडात आकेशियाची कत्तल

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

प्रशासन निद्रिस्त : लाकूडमाफियांचे बिनबोभाट राज

मंडणगड : रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या आकेशियाच्या तोडीला मंडणगडात रान मोकळे मिळाले आहे. प्रशासनही निद्रिस्त असल्याने लाकूडमाफियांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे सध्या मंडणगड तालुक्यात आकेशियाची बेसुमार कत्तल केली जात आहे.सामाजिक वनीकरण विभागाने वनीकरण मोहीमेद्वारे ही आकेशियाची झाडे लावली होती. वनीकरण विभागाने ३० वर्षे मेहनत करुन ही झाडे मोठी केली. त्यामुळे तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा आकेशियाची झाडे दाटीवाटीने उभी दिसतात. मात्र, या शासकीय झाडांवर लाकूडमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. सागाला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकेशियाची बेसुमार कत्तल सुरु आहे. मोठ्या संख्येने आकेशियाची वृक्षलागवड करण्यात आल्याने हे झाड विनासायास उपलब्ध होत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आकेशियाची वृक्षलागवड सुरु आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभाग व सामाजिक वनीकरण विभाग परस्परांकडे बोटे दाखवण्यात मग्न असल्याने लाकूडमाफियांना रान मोकळे मिळाले आहे. या झाडांचा ताबा सध्या बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे जागा मालकाच्या पूर्वपरवानगीने वन विभाग वृक्ष तोडीचे परवाने संबंधितांना देऊ शकत नाही, हे उघड आहे. मात्र, तरीही तालुक्यात होत असलेली वृक्षतोड कशाच्या आधारावर सुरु आहे, असा सवाल केला जात आहे.आंबडवे, पाथरळ, घोसाळे, पालवणी, बोरघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आकेशियाची कत्तल होत आहे. वन खात्याने ही बाब आपल्या कार्यक्षेत्राबाहेरची असल्याचे सांगत हात झटकले आहेत. याबाबत तहसीलदार कविता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यापर्यंत याबाबत कोणतीच माहिती पोहोचली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)