शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:29 IST

पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधुके, गारठा वाढला, अखेर पाऊस थांबलाआता प्रतीक्षा आंबा - काजू कलमे मोहोरण्याची

रत्नागिरी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.अद्याप जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे कलमांना पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ८० टक्के कलमांना सध्या पालवी आहे. पालवी जून होण्यासाठी किमान ४० ते ४५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर मोहोर प्रक्रिया सुरु होते. गेले दोन दिवस थंडी सुरु झाल्यामुळे जानेवारीमध्ये मोहोर प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

जानेवारीमध्ये पारा प्रचंड खाली येतो. नीचांक हवामानामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. बहुतांश मोहोरावर फळधारणा होत नाही. शिवाय पुनर्मोहोरदेखील होत असल्याने या हंगामात मोहोर आला तर हे दुहेरी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागणार आहे. मोहोर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन कीटक नाशकांची फवारणी करावी लागणार आहे.आॅक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन कलमांच्या मुळांना ताण देऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. मतलई वाºयामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होतो, थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने होते. मात्र, अद्याप थंडी फारशी नसल्याने मोहोर प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सध्या २० टक्के उर्वरित कलमांना थंडीमुळे मोहोर येण्याची शक्यता आहे. परंतु पालवी सुरु झाल्यास हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.जास्त थंडीमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे थ्रीप्स, बुरशी, तुडतुडासारख्या कीटकांचा प्रभाव वाढू शकतो. गतवर्षीदेखील थ्रीप्स व तुडतुड्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. यावर्षी नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्यामुळे खर्च वाढतो. सध्या बागायतदारांनी पालवीचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे. 

हवामानावर अवलंबून असलेल्या आंबा पिकाचा हंगाम यावर्षी एक ते दीड महिना उशिरा होणार आहे. सध्या सर्वत्र पालवी आहे. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्यामुळे हा आंबा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता असून, एकाचवेळी आंबा बाजारात आला तर दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत प्रचंड खर्च केला जातो, त्या तुलनेत आंब्याला दर प्राप्त होत नसल्याने शेतकरी बांधव दरवर्षी आर्थिक दुष्टचक्रात सापडत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकावर परिणाम होत असल्याने आंबा पीक खर्चिक बनले आहे.- एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान