मंडणगड : मंडणगड - खेड रस्त्यावर केळवत, पालघर, कुंबळे व दुधेर या गावांच्या हद्दीत खड्डेच खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. गेल्या पावसातच मंडणगड - खेड मार्गावरील दहागावपर्यंतचा अकरा किलोमीटर रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. मात्र, यावर्षीच्या पूर्ण हंगामात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. साधे खड्डेही बुजविण्यात आले नाहीत. त्यातच वादळामुळे आलेल्या पावसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखलमिश्रीत पाण्याचे साम्राज्य पसरले आहे व अशीच परिस्थिती राहिल्यास पावसात या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील गावांमधून होत आहे. अगदीच काही नाही तर चिऱ्याचे डबरीने तरी हे खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
-------------------------------
मंडणगड तालुक्यातील केळवत - कुंबळे - दुधेरे रस्त्यावर खड्डे पडल्याने पाणी साचले आहे.