शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मंडणगड-दापोली एसटी बसवर दगडफेक, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 14:12 IST

दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.

दापोली : दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत चालक अनंत दयाळकर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर, बसचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. दापोली पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली आगारामधील चालक अनंत दयाळकर हे आपल्या ताब्यातील बस घेऊन रविवारी, २ जानेवारी रोजी मंडणगड वरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास ते पालगड या ठिकाणी बस घेऊन आले. त्यावेळी पालगड जोशी बंगल्याच्या पुढे अज्ञात दुचास्कीस्वाराने चालत्या बस वर अंधारातून दगड भिरकावले. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. काच फुटून तो दगड चालक अनंत दयाळकर यांच्या पायावर लागल्याने त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात अज्ञाता विरुद्ध भा.दं. वि. कलम ४२७, ३३७ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप