शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे महेंद्र मयेकरच नगराध्यक्ष

By admin | Updated: October 30, 2014 00:50 IST

उमेश शेट्ये : अविश्वास ठराव आणल्यास सहकार्य नाही

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मीच त्या पदाचा दावेदार होतो. मात्र, ज्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला तेच आता खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे भाजपाचे महेंद्र मयेकर हे आपला २३ डिसेंबर २०१६ पर्यंतचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेल्यास आपण त्यावर सही करणार नाही, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उमेश शेट्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नजीकच्या काळात रत्नागिरी नगराध्यक्षपदावरून राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत. रत्नागिरी पालिकेत पावणेतीन वर्षांपूर्वी सेना - भाजपा युतीची सत्ता आली. त्यावेळी प्रत्येकी सव्वा वर्ष नगराध्यक्षपद सेना - भाजपाकडे आलटून पालटून राहील, असे ठरविण्यात आले होते. मात्र, त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे अशोक मयेकर यांचे सव्वा वर्ष संपताच सेनेचा नगराध्यक्ष पालिकेत बसणार होता. उमेश शेट्ये यांना सेनेतर्फे नगराध्यक्षपद देण्याचे जवळपास निश्चित झालेले असताना आयत्यावेळी भाजपने निवडणूक काळापुरते तीन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद मागितले व ते देण्याचा निर्णय झाला, त्यामागे राजकारण होते. त्यामुळे आता मयेकर यांच्या विरोधात अविश्वास मांडला गेलाच, तर त्यावर आपण स्वाक्षरी करणार नाही, असे शेट्ये म्हणाले. रत्नागिरी पालिकेत २८ नगरसेवक असून, सेना-भाजपा युती राज्यस्तरावर तुटली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व सेनेचे नगरसेवक यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तरी त्यासाठीचे २१ हे संख्याबळ पूर्ण होत नसल्याने महेंद्र मयेकर यांचे नगराध्यक्षपद सुरक्षित बनले आहे. तरीही अविश्वास ठराव आलाच तर त्याला आपला पाठिंबा नसेल, असेही उमेश शेट्ये यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपण तीन महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. आपले सीमकार्ड हे पोस्टपेड आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण करणार, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल्याने पुढील दोन वर्षे तरी मयेकर हेच नगराध्यक्षपदी राहणार असल्याची स्पष्ट चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)