शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत ‘महा’फूट

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

रत्नागिरी पालिका : महायुतीच्या सत्तेला बंडखोरीचे ग्रहण लागणार?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये उभी फूट पडल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेगळीच कलाटणी लागली आहे़ या फुटीमुळे भाजपाच्या सहा नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली आहे़रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीने विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे़ त्यासाठी मुंबईत शिवसेनेबरोबर भाजपाच्या नेत्यांनी वाटाघाटी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अशोक मयेकर यांना आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने महायुतीतर्फे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली़ अशोक मयेकर यांना पुन्हा नगराध्यक्षपद देण्याबाबत भाजपाच्या ६ नगरसेवकांकडून तीव्र विरोध होता़ त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी आज आपला वेगळा गट तयार केला़ त्यासाठी या नगरसेवकांनी एक बैठक घेऊन नगरसेवक महेंद्र मयेकर यांना गटप्रमुख म्हणून नियुक्त केले़ त्यानंतर महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ आज सायंकाळी उशिरा भाजपाच्या नगरसेविका संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, प्रज्ञा भिडे, दिपा आगाशे, पल्लवी पाटील आणि नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले़ त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे़ नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतर्फे अशोक मयेकर, काँग्रेस आघाडीच्यावतीने नगरसेवक सुदेश मयेकर, महायुतीतील शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये आणि भाजपाचे नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ महायुतीमध्ये नगरसेवक उमेश शेट्ये यांनी बंडखोरी करतानाच महेंद्र मयेकर यांनी थेट अशोक मयेकर यांनाच आवाहन दिले आहे़ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे १५, भाजपाचे ८ असे महायुतीचे २३ नगरसेवक आणि राष्ट्रवादी ७ व काँग्रेसचे १ असे काँगे्रेस आघाडीचे ८ असे पक्षीय बलाबल आहे़ यामध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली़ शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये यांच्याबरोबर त्यांच्याच पक्षातील २ नगरसेवक असल्याने महायुतीचे आणखी ३ नगरसेवक फुटले़ त्यामुळे आता महायुतीकडे केवळ १४ नगरसेवक राहिले आहेत़ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये काँग्रेस आघाडीचे ८, भाजपाचे फुटीर ६ नगरसेवक आणि शिवसेनेचे ३ असे एकूण संख्याबल १७ झाले आहे़ अशोक मयेकर यांना शह देण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीचे नगरसेवक यांनी एकजूट केल्यास युतीच्या सत्तेला मोठा धक्का बसणार आहे़ (शहर वार्ताहर)रत्नागिरीत चार अर्ज दाखलनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आली होती. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ उमेश शेट्ये यांचाच अर्ज दाखल झाला असून भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर आणि राष्ट्रवादीतर्फे सुदेश मयेकर या तीन ‘मयेकर’ अर्ज आज दाखल झाले आहेत.