शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:06 PM

तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

ठळक मुद्देकार्यालय ग्रामपंचायत हद्दीत नेल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधणार ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले कार्यालय तातडीने राजापूर शहरात आणण्यात यावे, अशी मागणी

राजापूर : तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

विशेष म्हणजे विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांच्या इमारतीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय होते. मात्र, आता राजापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोदवली ग्रामपंचायत हद्दीत हे कार्यालय नेण्यात आले आहे.ज्याठिकाणी जाण्यासाठी आता ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार आहेत. तसेच झेरॉक्स, चहा वा परतीच्या प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध नाही, अशा ठिकाणी कोदवली येथील पॉवर हाऊसच्या स्टोअर रूममध्ये हे कार्यालय महावितरणने स्थलांतरित केले आहे.

याआधी दोन वर्षांपूर्वी शहर कार्यालयही असेच हलविण्यात आले असून, आता भाग एक व भाग दोन कार्यालये हलवून महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले आहे. महावितरणचे राजापूर शहर कार्यालय तातडीने शहरात आणण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

शहरासह तालुक्यातील वीज समस्यांबाबत माजी आमदार गणपत कदम, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी १३ आॅक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत जाबही विचारला होता.

विशेष म्हणजे राजापूरमधील कोणत्याही आमदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे त्यावेळी लक्ष दिले नव्हते. महावितरण कडून ग्राहकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून, जीर्ण वीजवाहिन्या, कमी-अधिक दाबाचा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

याचवेळी महावितरणच्या मनमानी कारभारामुळे राजापूरकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर प्रगत राजापूर संघटनेने उठाव केल्यावर माजी आमदार गणपत कदम यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली होती.महावितरणचे अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याची कायम ओरड होत असतानाच आता शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे कार्यालय नेण्यात आल्याने या अधिकाऱ्यांचे फावणार आहे. यापूर्वीच शहर कार्यालय पॉवर हाऊस येथे हलविण्यात आल्याने तांत्रिक कर्मचारी शहरातील भाग एक कार्यालयात बसत असत.

मात्र, आता हे कार्यालयदेखील ग्रामपंचायत हद्दीत नेण्यात आल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधावे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. महावितरणने शहर कार्यालय तातडीने राजापूर शहरात न आणल्यास वीज बिले न भरण्याबरोबरच नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी