शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून रत्नागिरीतील ४६५ ग्राहकांना प्रकाशाची ‘दिवाळी भेट’

By मेहरून नाकाडे | Updated: November 13, 2023 18:02 IST

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी 'प्रत्येक घरी दिवा - प्रत्येक घरी दिवाळी' हा संकल्प केला होता. त्यानुसार ...

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी 'प्रत्येक घरी दिवा - प्रत्येक घरी दिवाळी' हा संकल्प केला होता. त्यानुसार महावितरणनेरत्नागिरी जिल्ह्यातील ४६५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन दिवाळीला प्रकाशाची भेट दिली आहे.दिवाळी म्हणजे दीपांचा, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला. प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, या भूमिकेतून मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. अधीक्षक अभियंता स्वप्निल काटकर (रत्नागिरी मंडल) यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित जबाबदारी सर्व विभागीय कार्यकारी अभियंता व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेत नियोजन केले होते. महावितरण मुख्यालयाकडून आवश्यक वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले.ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी कामास सुरूवात केली. सलग १५ दिवस सातत्यपूर्ण परिश्रमातून रत्नागिरी जिल्ह्यात ४६५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन प्रकाशाचे नाते जपले. अस्तित्वातील विद्युत यंत्रणेतून रत्नागिरी जिल्ह्यात ३४६ ग्राहकांना आणि नवीन विद्युत यंत्रणा उभारणी करुन रत्नागिरीत जिल्ह्यात ११९  ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरणelectricityवीज