रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ए. पी. एल. धारकांना अद्याप धान्यपुरवठा नाही, या दोन प्रमुख मुद्द्यासंह अन्य मागण्यांसाठी महायुतीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. आंबा बागायतदारांना भरपाई मिळालीच पाहिजे, रेशन दुकानावर धान्य मिळालेच पाहिजे याचबरोबर लोकसभा झाकी है, विधानसभा बाकी है, एक धक्का और दो आघाडी शासन तोड दो, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जयस्तंभ परिसर दणाणून सोडला. भाजप, शिवसेना आणि आर. पी. आय. (आठवले गट) महायुतीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यात भाजपचे प्रवक्ते बाळ माने, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रवक्ते उमेश शेट्ये, शहराध्यक्ष संजय पुनसकर, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, प्रा. नाना शिंदे, तसेच रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळ माने, सचिन वहाळकर, प्रा. नाना शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाच्या समाप्तीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे तसेच तहसिलदार मारूती कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश मुकादम, शिक्षण सभापती सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष बाबा बार्इंग, आंबा बागायतदार सुर्यकांत सावंत, विजय बेहेरे, राजू जाधव, उदय बने, मुन्ना चवंडे, सभापती अनुष्का खेडेकर, उपसभापती योगेश पाटील, शरयू गोताड, पल्लवी पाटील, राजश्री शिवलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज्य शासनाविरोधात महायुतीचा ‘एल्गार’
By admin | Updated: June 3, 2014 02:03 IST