शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 17:30 IST

mahavitaran, coronavirus, ratnagirinews लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. वीजबिल माफीसाठी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. मात्र, वीजग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत यांनी रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देवाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपोषणवीजग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात आल्याचा निषेध

रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. वीजबिल माफीसाठी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. मात्र, वीजग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत यांनी रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल माफी मिळावी या मागणीसाठी मनसेतर्फे पाठपुरावा सुरू आहे. वीज ग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सप्टेंबरमध्ये बेमुदत उपोषण पुकारले होते. आंदोलनादरम्यान स्थानिक पोलीस प्रशासनाने घडवून आणलेल्या चर्चेदरम्यान संबंधित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले होते.यावेळी महावितरणतर्फे उपकार्यकारी अधिकारी संगमेश्वर यांनी चर्चा करताना वीजबील माफी किंवा जमीनदार शेतकरी यांना भाडे व नुकसान भरपाई देणे, सध्याच्या बिलात आलेले व्याज रद्द करण्यात यावे, या प्रमुख मुद्यावर आठ दिवसात बैठक बोलावून संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक प्रस्ताव कंपनीच्या मुख्य कार्यालय व शासन दरबारी दाखल करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, वीजबिल माफी व अन्य मागण्यांबाबतीत कार्यवाही न झाल्याने मनसेने उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत, शहराध्यक्ष सतीश राणे यांच्यासह रूपेश जाधव, राजापूरचे तालुकाध्यक्ष राजू पवार, राज्य परिवहन कामगार सेनेचे सुनील साळवी, उपशहराध्यक्ष सिध्देश धुळप, अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या