शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : गरमागरमीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:18 IST

एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.

ठळक मुद्देऑक्टोबर हीटचा तडाखा, कार्यकर्त्यांसह नेतेही झाले घामाघूमलोकसभेप्रमाणेच विधानसभेचा प्रचारही घाम फोडणारा

मनोज मुळये रत्नागिरी : एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.गत सप्ताहात पावसाने हजेरी लावली असली तरी या आठवड्यात पावसाची शक्यता कमीच आहे. आता ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढू लागला आहे. १४पासून सुरू झालेल्या या आठवड्यात तापमानाचा पारा ३० अंशाच्या पुढेच गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या मानाने हे तापमान अंगाची लाहीलाही करणारे आहे.उन्हाच्या कडाक्यातच उमेदवारांचा प्रचार वाढत चालला आहे. २१ रोजी मतदान असल्याने आता मोजकेच दिवस हातात राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारानेही टोक गाठले आहे. यावेळी सर्वच पक्षांनी जाहीर सभांपेक्षा वाडीवाडीत ग्रामस्थांना जाऊन भेटण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे या उन्हाचा चांगलाच सामना उमेदवारांना करावा लागत आहे. उष्णता वाढल्याने काही उमेदवारांना खोकल्याचाही त्रास सुरू झाला आहे. मात्र औषधोपचार घेत प्रचाराला गती दिली जात आहे.रात्री दहा वाजता प्रचार संपल्यानंतरही कार्यालयात बसून दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रचाराचा आढावा घेणे आणि दुसऱ्या दिवशीचे नियोजन करणे सुरू असते. त्यामुळे पुरेशी विश्रांती नाही, अशी स्थितीही उमेदवारांची झाली आहे.दोन दिवस तापमान ३४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यातही सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत तापमान ३१ अंशाहून जास्त असेल. या वेळात प्रचाराची तीव्रता वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे.समुद्रकिनाऱ्यावर असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच घाम अधिक येतो आणि त्याने थकवा लवकर येतो. आता प्रचार करणाऱ्यांसमोर हाच प्रश्न मोठा आहे. लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात झाल्या होत्या. तेव्हाही उन्हाच्या झळा अशाच वाढल्या होत्या. अर्थात त्यावेळी तापमान ४० अंशापेक्षा अधिक होते. त्यामानाने आता उष्मा कमी आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRatnagiriरत्नागिरी