शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
6
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
7
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
8
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
9
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
10
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
11
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
12
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
13
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
15
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
16
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
17
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
18
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
19
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
20
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 

महाबळेश्वर, कोयनेत धुवांधार!

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

जिल्ह्यात संततधार : लहानग्यांचा ‘योगदिन’ बुडाला

सातारा : सातारा शहरासह महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, नवजा, तापोळा परिसरात शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. नवजा येथे चोवीस तासांत २७१, तर महाबळेश्वरमध्ये २८०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारा शहरात रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. राजवाडा, पोवई नाका परिसरात पाणी रस्त्यावर आले होते. रविवारच्या आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. दुपारी रस्ते निर्जन झाले होते.पाटण/ कोयनानगर : कोयना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे कोयना धरणात ३१.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी धरणात ३०.१९ टीएमसी साठा होता. चोवीस तासांत त्यात १.१२ टीएमसी भर पडली. पाटण तालुक्यातील केरा, कोयना, काफना, काजळी, तारळी, वांग या नद्यांची पाणीपातळी वाढू लागली असून, पहिलाच पाऊस असल्याने अद्याप पूरस्थिती उद््भवलेली नाही, परंतु दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. योगदिनानिमित्त शाळांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही विद्यार्थी जाऊ शकले नाहीत. महाबळेश्वर : येथे रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत. वेण्णा लेकमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढली असून, पाऊस असाच कायम राहिला, तर तलाव पाच दिवसांत भरणार आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी थंडीच्या बचावासाठी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या आहेत, परंतु शनिवार, रविवार सलग सुट्या असल्यामुळे पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची विशेषत: पुणे, मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पावसाने रुद्रावतार धारण केल्यामुळे पाणी महाबळेश्वर-पुणे रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोही, खटाव तालुक्यातील वडूज, कातरखटाव, औंध, पुसेगाव, पुसेसावळी, मायणी येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. वाई तालुक्यातील भुर्इंज, पाचवडसह फलटण तालुक्यातील विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर कायम आहे.जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस मिलीमिटरमध्ये असा : सातारा २९.९, जावळी ५७.१, कोरेगाव १०.४, कऱ्हाड २०.५, पाटण ७७.९, फलटण २.९, माण १.९, खटाव ५.२, वाई १८.४, महाबळेश्वर ११९.८, खंडाळा ९.४.प्रतापगडावर दरड कोसळलीकिल्ले प्रतापगड येथील वाहनतळाजवळ काही दरड कोसळ्ल्यामुळे काही वेळ या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.