रत्नागिरी : ह्यएम. एस. कर्णिकाह्ण नावाचे प्रवासी जहाज गुरूवारी पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल झाले. तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे सकाळी आलेले हे जहाज सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. यात ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवासी होते.रत्नागिरी बंदरे समुहातील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांच्या लावगण येथील बंदर संकुलात जलेश कंपनीचे प्रवासी जहाज ह्यएम. एस. कर्णिकाह्ण गुरूवारी सकाळी ८ वाजता ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवाशांसह यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे दाखल झाले. महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर कॅ. उगलमुगले यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने प्रवासी जहाज वाहतुकीच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.बुधवारी रात्री मुंबईहून निघाले आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता आंग्रे पोर्ट जयगड येथे दाखल झाले. या जहाजाची लांबी २४३ मीटर आणि रूंदी ३२.२५ मीटर आहे. या जहाजामध्ये प्रवाशांसाठी स्वीमिंगपूल, भोजनाकरिता हॉटेल व रेस्टॉरंट, रूम्स, लहान मुलांसाठी खेळणी, जीम व स्लाईड आदी सुविधा आहेत. या बोटीमधून आलेल्या सर्व प्रवाशांना गणपतीपुळे व मालगुंडचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर ही प्रवासी बोट सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.
रत्नागिरीत प्रथमच एम. एस. कर्णिका नावाचे प्रवासी जहाज -- जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:44 IST
महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले.
रत्नागिरीत प्रथमच एम. एस. कर्णिका नावाचे प्रवासी जहाज -- जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे आगमन
ठळक मुद्देप्रवाशांना मालगुंडसह गणपतीपुळे परिसराची सफर