शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा मुंबई - गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:47 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा मुंबई - गोवा महामार्गावर अपघाती मृत्यूशवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार

आरवली : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.उन्हामुळे नैसर्गिक स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र फिरत आहेत. पाण्याच्या शोधासाठी मुंबई - गोवा महामार्ग ओलांडत असतान एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.

महामार्गाच्या पलिकडील बाजूला पाण्याचा स्रोत असल्याने तुरळ हरेकरवाडीकडून महामार्गावरून कडवई साळवीवाडी भागाकडे पाण्यासाठी अनेक वन्यप्राणी रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ये - जा करताना दिसतात. हा बिबट्या पाण्यासाठीच आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.सकाळी या मार्गावरून प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला हा बिबट्या पडल्याचे मुरडव गावचे पोलीस पाटील राजा मेने यांनी पाहिले. त्यांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली. परिमंडळ वनाधिकारी सुरेश उपरे वनरक्षक आनंद धोत्रे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

वाहनांच्या धडकेमुळे बिबट्याच्या मागील उजव्या पायाला मार लागला असून, जोरदार धडक मिळल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग