शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील समुद्रात डांबराच्या गुठळ्या, गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय

By अरुण आडिवरेकर | Updated: September 23, 2022 16:40 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. या गुठळ्या गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.रत्नागिरी कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरी ते गोवा रेकी करण्यात आली. रत्नागिरी ते गोवा या दोन तासांच्या सोर्टीमध्ये तेल प्रदूषणाचा कोणताही गंभीर धोका आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यापासून ७-८ मैल अंतरावर तेलाचा पातळ थर आढळला असून, त्याची स्वत:हून बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, अपघात ग्रस्त ‘पार्थ’ तेलवाहू जहाजामधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाली आहे. राजापूर तालुक्यातील साखरीनाटे - आंबोलगड - वेत्ये - किनाऱ्यासमोर १८ वाव खोल समुद्रात दोन दिवसापासून ठिकठिकाणी डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या डांबराच्या गुठळ्या गावखडीपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे.रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या डांबराच्या गुठळ्याबाबत मच्छिमारांनी मत्स्य खात्याला माहिती दिली आहे. त्यानंतर सारी यंत्रणा सतर्क झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार