शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 14:33 IST

fisherman Ratnagiri : मासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले.

ठळक मुद्देसाखरतर‌ येथील मासेमारी नौका सुदैवाने बचावलीवरवडे किनारी आसरा; नऊ खलाशी सुखरूप

रत्नागिरी : मासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे वेगवान वारा या कचाट्यात सापडलेली नौका सावरत सावरत वरवडे किनाऱ्यावर लागली. सुदैवाने या नौकेवरील ९ खलाशी बालंबाल बचावले.शासनाने जाहीर केलेल्या मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलै रोजी संपला. त्यानंतर ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मासळी चांगली मिळत असल्यामुळे समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांची लगबग असते.

रविवारी सकाळी अनेक मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. साखरतर येथील एका मच्छीमाराची नौकाही मासेमारीसाठी होती. सकाळी मासेमारीसाठी बाहेर पडलेली नौका दहा वाव समुद्रात जाळे टाकून होती. खवळलेल्या समुद्रात अचानक नौकेचे इंजिन बंद पडल्याची जाणीव झाली.

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर नौका भरकटू लागली. त्या नौकेवर नऊ खलाशी होते. वारा आणि लाटांबरोबर ही नौका भरकटत वरवडे किनाऱ्यावर येऊन विसावली. सुदैवाने पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना होता होता वाचली.किनाऱ्यावर वेगाचे वारेवातावरण बिघडल्यामुळे किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून, पाण्यालाही प्रचंड करंट आहे. मच्छिमारांना सावधानतेचाही इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून मच्छीमार समुद्रात जात आहेत.

सध्या प्रत्येक नौकेला शंभर ते दीडशे किलो चालू कोळंबी मिळत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत. किलोला दोनशे ते अडीचशे रुपये दर सहज मिळतो. दोन महिने नौका बंद असल्यामुळे मच्छीमार बदलत्या वातावरणाचा विचार करत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी