शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा कमी, तरी झळ कायम

By admin | Updated: May 10, 2016 02:28 IST

प्रत्यक्षात आकडा हजारात : तब्बल ५४ गावांतील ९८ वाड्यांना पाणीटंचाईने घातलाय विळखा

रहिम दलाल --रत्नागिरी जिल्ह्यात टंचाईग्रस्त १२,२०९ लोकांची शासन दरबारी नोंद असली तरी प्रत्यक्षात लाखभर लोकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. आज जिल्ह्यात ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने विळखा घातला आहे. जिल्ह्यातील अनेक वाड्या अजूनही तहानलेल्या आहेत. उन्हाळ्यात या वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली की, यावर तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर किती वर्षे तहान भागवणार? या वाडी - वस्त्यांची कायमची तहान भागवण्यासाठी पाण्याचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. पाणीटंचाईला सामोरे जाणारे लोक भीषण वास्तव नीमूटपणे सहन करत आहेत. जिल्ह्यात एप्रिल २०१६मध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागतो. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात खासगी विहिरींचे मालक पाणी विक्रीचा व्यवसाय करीत असून, दररोज हजारो रुपयांची कमाई करीत आहेत. गेल्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, पाणीटंचाईची तीव्रता गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. कमी पावसामुळे यावर्षी पाणीटंचाई तीव्र होणार असे वाटत होते. ग्रामीण भागामध्ये उभारलेल्या सुमारे ५००० बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईच्या झळा कमी बसत आहेत. मात्र, कच्चे बंधारे, विहिरी, नद्या, नाले, तलाव आटल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी आजच्या दिवशी ६० गावातील १२२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई होती. यंदा त्यापेक्षा कमी गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यात १० गावांतील २३ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे आज ५४ गावांतील ९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या टंचाईग्रस्तांना शासकीय १० आणि खासगी ४ अशा एकूण १४ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. आतापर्यंत या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सद्वारे ७४७ फेऱ्या मारल्या आहेत. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्या डोंगराळ भागात असल्याने पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते.पाणीटंचाईचा फटका १२,२०९ लोकांना बसला असल्याची नोंद शासन दरबारी असली तरी प्रत्यक्ष लाखभर लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. अनेक गावांतील विहिरी, तलाव, विंधन विहिरी, पाण्याचे स्रोत आटल्याने लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.