कणकवली : कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी रविवारी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. कलमठ येथील वृंदावन सभागृहात एनसीसी कॅडेटनी विविध योगासने केली.उत्तर अर्धगोलार्धातील सर्वात मोठा दिवस २१ जून असल्याने यादिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार योगदिन साजरा करण्यासाठी गेले काही दिवस नियोजन तसेच तयारी करण्यात येत होती. कणकवली शहरापासून जवळच असलेल्या वृंदावन सभागृहात कणकवली, देवगड तसेच अन्य तालुक्यातील एनसीसी कॅडेटनी एकत्रितपणे योगदिन साजरा केला. रविवारी विविध योगासने या एनसीसी कॅडेटनी केली.योगासने ही एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे मानवी जीवन निरामय होते. फक्त त्याचा पद्धतशीर व सातत्याने सराव केला पाहिजे. शास्त्रीय पद्धतीनेच योगाची उपासना केली पाहिजे. शरीर व मन यांना एकत्र आणण्याचे काम योगसाधनेने केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाच्याच दिवशी फक्त योगासने न करता इतर दिवशीही शरीर निरोगी राहण्यासाठी योगासने करण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी केला. दरम्यान, शनिवारी तालुक्यातील काही ठिकाणी तंत्रशुद्ध योगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिक्षकांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)
योगसाधनेला उदंड प्रतिसाद
By admin | Updated: June 22, 2015 00:11 IST