शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

आठवीच्या तब्बल ५0 वर्गांना कुलूप !

By admin | Updated: July 9, 2015 00:04 IST

शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी : शून्य पटसंख्येमुळे जिल्ह्यातील आठवीचे ५० वर्ग बंद करण्यात येणार आहेत. गतवर्षी चौथीच्या शाळांना पाचवी व सातवीच्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. प्राथमिक शाळांना आठवीचे १७५ वर्ग जोडण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा हायस्कूलकडे असलेला ओढा लक्षात घेता ५० वर्गाना याचा फटका बसला आहे.शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पदवीधर शिक्षकांअभावी पहिले वर्ष रडतखडत पूर्ण करण्यात आले. मात्र, यावर्षी पटसंख्या घसरल्यामुळे ५० वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु असलेल्या आठवीच्या वर्गात पाल्याला न घालण्याचा पालकांचा कल लक्षात घेता भविष्यात अन्य वर्गांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.ज्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत, त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सोयीसुविधा, पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, शैक्षणिक सोयीसुविधा तसेच प्रयोगशाळा यांचा अभाव निदर्शनास आला आहे. जिल्हा परिषदेकडून या सुविधा न पुरविल्याने विद्यार्थ्यांची परवड झाली आहे. जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सर्वाधिक वर्ग बंद पडले आहेत. त्यापाठोपाठ दापोलीतील वर्ग बंद पडले आहेत. संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील एकही वर्ग बंद पडलेला नाही.समाजातील सर्व घटकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने बालकांचा सक्तीचा व मोफत कायदा शासनाने सुरु केला. त्याची अंमलबजावणी करीत असताना काही शाळांना पटसंख्येचा फटका बसला आहे. सुरुवातीला विद्यार्थी व पालकांकडून आठवीच्या वर्गाला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)तालुका मराठी उर्दूचे बंद माध्यम वर्ग पडलेलेवर्गवर्गमंडणगड२११०२दापोली९३१५खेड२७२७चिपळूण५००००गुहागर८११७संगमेश्वर४७१००रत्नागिरी८२१ (उर्दू)लांजा२४१५राजापूर१५१३एकूण१६४११५०