शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर

By admin | Updated: October 17, 2014 00:40 IST

पर्यटन महामंडळ : निवास न्याहरी योजनेबाबत विभागवार बैठका-लोकमतचा प्रभाव

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -पर्यटन व्यवसायाच्या विस्ताराबरोबरच कोकणात काही अपप्रवृत्तींचाही शिरकाव होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या निवास न्याहरी योजनाधारकांनी योग्य सुरक्षा व्यवस्था केलेय की नाही, पर्यटकांबाबत योग्य नोंदी ठेवल्यात की नाहीत, याबाबत करडी नजर ठेवली जाणार आहे. या दिवाळीनंतर दोन्ही जिल्ह्यात योजनाधारकांच्या विभागवार बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यात सुरक्षाविषयक काय व कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुहागर येथे गेल्या पंधरवड्यात कासवमित्र विश्वास खरे यांचा प्लेझर पॉइंट या त्यांच्या पर्यटक निवासस्थानात राहायला आलेल्या पर्यटकांनी खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या निवास न्याहरी योजनेतील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. गुहागरमध्ये जो प्रकार घडला तो गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळेच पर्यटन व्यवसायात असलेल्या लॉजिंग, निवास न्याहरी यांसारख्यांना सुरक्षाविषयक दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. याआधी निवास न्याहरी योजनाधारकांना दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करावे लागत होते. परिणामी दरवर्षी त्यांनी ठेवलेल्या नोंदी तपासणे, योजनेची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करणे शक्य होत असे. आता पहिल्या नोंदणीनंतर पुन्हा वर्षभराने दिला जाणारा नोंदणी परवाना हा पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था व अन्य नियमांचे तंतोतंत पालन केले जाते की नाही, याची पाहणी करण्यासाठी पर्यटन महामंडळाला तशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. तसेच दरवर्षी वा सहा महिन्यातून एकदा किंवा अचानकपणे सुरक्षाविषयक आढावा घेण्याबाबतही विचार होऊ शकतो. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे ते म्हणाले. निवासी न्याहरी योजनेत पर्यटकांची सुरक्षितता हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गणपतीपुळे, दापोली, गुहागर तसेच ज्या भागात योजनाधारक अधिक आहेत त्या ठिकाणी अशा मागर्दशन सभा घेण्यात येतील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रत्येकी तीन ते चार सभा होतील. त्याबाबतचे नियोजन केले जात असून, दिवाळीनंतर या सभा घेतल्या जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)