शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

वाळू उपशावर महसूलची करडी नजर

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

तीन पथके तयार केली

मंडणगड : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असून, याविरुद्ध आता महसूल खात्याने जोरदार मोहीम उघडली आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी महसूलची तीन पथके तयार करण्यात आली असून, ती पथके त्या त्या क्षेत्रात नजर ठेवून राहणार आहेत.महसूल विभागाने शुक्रवारी वाळू उपशाबाबत धडक कारवाई केली होती. यामध्ये चार वाळू व्यावसायिकांवर ३ लाख ४५ हजार ५८८ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. उमर अहमद मुकादम, अस्लम मुकादम, बाबामियाँ मांडेकर, उस्मान मांडेकर अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या साऱ्यांकडे एकूण ९३ ब्रास अनधिकृ त वाळूसाठा आढळून आला.एवढी कारवाई करण्यात आली असली तरी महसूल विभागाच्या कारवाईला मर्यादा पडत असल्याचे उघड झाले आहे. कारवाईत पाण्यात बुडवलेले संक्शन पंप दुरुस्ती करुन नंतर वापरले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत धरुन केलेली कारवाई फुकट जात आहे. कारवाई करताना आवश्यक असणारी बोट, लाईफ जॅकेट, गॅस कटर, क्रेन, डंपर उपलब्ध नसल्याने महसूल विभागाची कारवाई म्हणजे दिखाऊपणाच असल्याचे दिसून येत आहे.म्हाप्रळ, आंबेत पुलानजीक रायगड येथील वाळूमाफिया वाळू उपसा करीत आहेत. महसूल विभागातील काही कर्मचारीच कारवाईपूर्वी त्यांना कल्पना देत असल्याने कारवाई म्हणजे केवळ फार्स ठरतो, असे बोलले जात आहे. मंडणगड हे जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागाने एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी काळात अशा प्रकारची मोहीम खाडीपात्रात संयुक्तपणे राबवण्यिात येणार असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. महसूल विभागाने वाळू उपशाविरोधात तीन पथके तयार केली आहेत. त्यामुळे आता वाळू उपसा करण्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मंडणगडात तीन पथकांची निर्मिती.दिवस-रात्र वाळू उपसा क्षेत्रात ठेवणार नजर.म्हाप्रळ येथील चार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई.चार दिवसांपूर्वी केली कारवाई.