शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

Lok Sabha Election 2019 ५७ टक्के उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:51 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे.

ठळक मुद्देमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी या पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या १६ लोकसभांमध्ये ५७ टक्के उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे.

अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते. सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते, हा आजवरचा अनुभव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार होते. अपक्षांची हीच सर्वात मोठी संख्या. रत्नागिरीमध्ये आजवरच्या १६ निवडणुकांपैकी दोनवेळा (१९५७, ७७) दुरंगी लढती झाल्या. दोनवेळा (१९७१, ९९) तिरंगी लढती झाल्या. तीनवेळा (१९५२, ६२, २००४) चौरंगी लढती झाल्या. १९६७, ८०, ८४, ८९, ९१, ९६, ९८, २००९ आणि २०१४ अशा नऊवेळा बहुरंगी लढती झाल्या आहेत. एकूण ८१ उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यातील ४६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

१९६७ सालची निवडणूक वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये विजयी आणि त्याच्याशी प्रमुख लढत झालेला पराभूत असे दोन उमेदवार वगळता इतर सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १९६७ साली काँग्रेसच्या शारदा मुखर्जी आणि त्यांचे प्रमुख विरोधक भारतीय जनसंघाचे ए. जी. कळसकर यांच्याखेरीज केवळ के. जी. पवार हे एकमेव अपक्ष उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

दोनवेळा दुरंगी लढत

१९५७ साली जनसंघाकडून प्रेमजीभाई आसर आणि काँग्रेसकडून जगन्नाथ भोसले तसेच १९७७ साली भारतीय लोक दलाचे बापूसाहेब परूळेकर आणि काँग्रेसकडून शामराव पेजे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.

किती लागतात मते?

एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग