शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 17:38 IST

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज

अरबी समुद्रात तयार झालेल्या 'निसर्ग'  चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातल्या अनेक गावांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये, मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी 'लोकसाधना' ही सामाजिक संस्थाही त्याला अपवाद नाही. संस्थेच्या महाविद्यालयाच्या 'लोकनिर्माण भवन' या इमारतीची या वादळात वाताहत झाली आहे.३० किलो वजनाचे चिरे भिंतीतून सुटून दूरवर जाऊन पडले, इतका वाऱ्याचा जोर जबरदस्त होता", अशी माहिती संस्थेचे विश्वस्त ऍड. कैवल्य दांडेकर यांनी दिली आहे. त्याखेरीज ग्रंथालय, आमराई तसेच संस्थेने गावासाठी उभारलेल्या बसथांब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपासच्या अनेक गावांमध्ये घरांचे व झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे मनुष्यबळ कमी उपलब्ध आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांचे कामाच्या घाईचे दिवस आहेत. 'या सर्व परिस्थितीत, संस्थेच्या वास्तूंचे नुकसान भरून काढणे आह्वानात्मक आहे', असेही ते म्हणाले.

गेल्या ३८ वर्षांपासून परिसरातील ४६ गावांसाठी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि समग्र ग्रामविकास अशा पंचसूत्रीवर संस्थेचे काम सुरू आहे. डॉ. राजा दांडेकर आणि शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या दूरदृष्टीच्या व अथक मेहनतीच्या बळावर संस्थेने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची पहाट आणली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने, कौशल्ये शिकवून गावात उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यापलिकडे जाऊन सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्नही आजवर संस्था करत आली आहे. कोरोना संकटकाळात जवळपास ४३ खेड्यांमध्ये सुरू असलेला संस्थेचा 'अन्नदान प्रकल्प' हे त्याचेच एक उदाहरण आहे. हेच सामाजिक भान जपत, शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटातही संस्थेसाठी श्रमदान करायला पुढे येण्याची तयारी दाखवली आहे.स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला या क्षणी, आर्थिक सहकार्याची गरज आहे. संस्थेला पाठवलेल्या देणगीचा प्रत्येक रुपया चोख हिशेबासह त्या-त्या कामासाठीच वापरला जाण्याचा संस्थेचा लौकिक आहे. www.loksadhana.org या संकेतस्थळाच्या मदतीने आपण संस्थेपर्यंत पोहोचून आपले योगदान देऊ शकता.आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक वादळे पेललेल्या लोकसाधना परिवारानं याही वादळावर मात करून उभे राहण्याचा चंग बांधला आहे. आणि त्यासाठी समाजाची साथ लाभेल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ