लोकनिर्माण हिरकणी सन्मान प्राप्त महिलांसमवेत खासदार विनायक राऊत यांच्यासह बाळकृष्ण कासार, मारुतीकाका जोयशी, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, रोहन बने, जयसिंग माने व युयुत्सू आर्ते आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : लोकनिर्माण व जायंट्स ग्रुप ऑफ देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्त्ववान महिलांना खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षीचा 'हिरकणी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, पंचायत समिती सभापती जयसिंग माने, प्रबोधनकार मारुतीकाका जोयशी, बाळकृष्ण कासार, जायंट्सचे उपाध्यक्ष प्रकाश कारखानीस, देवरुख जायंट्स ग्रुपचे संजय सुर्वे, युयुत्सू आर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरुख पार्वती पॅलेस येथील सभागृहात शनिवारी पार पडला.
या सोहळ्यांतर्गत चिपळूणच्या माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, देवरुख - हरपुडेतील आशा सेविका माधवी देसाई, लांजातील शिक्षिका वृषाली धाक्रस, देवरुखातील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एस. एस. सोनावणे, योगशिक्षिका शिला घस्ते, राजापूर येथील शिक्षिका सुयोगा सुनील जठार, ताम्हानेतील पोलीसपाटील अंजली संदीप नटे, देवरुखातील प्रजापिता ब्रह्माकुमारी अश्माच्या माधवी दीदी यांचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युयुत्सू आर्ते यांनी केले.