शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रत्नागिरीतील प्राणीमित्रांकडून बैलाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:16 IST

रस्त्याच्या पलिकडे वाहणाऱ्या पऱ्यामध्ये बैल पडल्याचा संदेश सोशल मीडियावर पडताच काही तासातच प्राणीमित्रांनी त्याची सुटका केल्याचा प्रकार रत्नागिरीत सोमवारी सकाळी घडला. शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्याच्या पलिकडे पडलेल्या या बैलाला प्राणीमित्रांनी जणू जीवदानच दिले.

ठळक मुद्देरत्नागिरीतील प्राणीमित्रांकडून बैलाला जीवदाननगर परिषदेच्या बेपर्वाईमुळे बैल पडला

रत्नागिरी : रस्त्याच्या पलिकडे वाहणाऱ्या पऱ्यामध्ये बैल पडल्याचा संदेश सोशल मीडियावर पडताच काही तासातच प्राणीमित्रांनी त्याची सुटका केल्याचा प्रकार रत्नागिरीत सोमवारी सकाळी घडला. शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्याच्या पलिकडे पडलेल्या या बैलाला प्राणीमित्रांनी जणू जीवदानच दिले.कठडा नसलेल्या पऱ्यामध्ये सोमवारी सकाळी बैल पडला होता. वजनाने अधिक असलेल्या बैलाचे पोट फुगले होते. त्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल होते. त्याचवेळी राजापूर येथील बेंद्रे यांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बैल उठू शकत नव्हता.या घटनेची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून फिरू लागताच त्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तेथे दाखल झाले. बैलाला बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचे कांबळे यांनी जेसीबी मागवला. या प्रकाराची माहिती प्राणीमित्र मुकेश गुंदेचा यांना मिळाली.

ते सहकाऱ्यांसह तेथे आले असता त्यांनी बैलाची पाहणी केली. त्याला आकडी आली असावी, हे त्यांच्या लक्षात आले. नगरपरिषदेचा जेसीबी आल्यानंतर त्या बैलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तेथे आलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत यांनी बैलाला इंजेक्शन दिले.नगर परिषदेच्या बेपर्वाईमुळे बैल पडलारत्नागिरी शहरातील अनेक ठिकाणी पऱ्या बंदिस्त करण्यात आलेले नाहीत. पऱ्याशेजारी कठडा नसल्याने कोणीही खाली पडण्याची शक्यता आहे. अंधारात या भागाचा अंदाज येत नाही. संरक्षक कठडा नसल्यानेच हा बैल खाली पडला. काही ठिकाणी गटारेदेखील उघडी असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी