शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चिपळुणात युवासैनिकांनी वाचविले दोघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:52 IST

चिपळूण : दिवा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नंदूरबार येथील एक ज्येष्ठ नागरिक धक्का लागून थेट बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्मवर आढळला. रेल्वेतून प्रवास करणाºया युवासैनिकांनी चिपळूण येथील युवासेना प्रमुख उमेश खताते यांच्याशी हेल्पलाईनवरून तत्काळ संपर्क साधला. काही मिनिटात युवासैनिक सावर्डे रेल्वे स्थानकावर पोहोचले व त्या जखमी नागरिकासह त्याच्या पत्नीला डेरवण ...

चिपळूण : दिवा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नंदूरबार येथील एक ज्येष्ठ नागरिक धक्का लागून थेट बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्मवर आढळला. रेल्वेतून प्रवास करणाºया युवासैनिकांनी चिपळूण येथील युवासेना प्रमुख उमेश खताते यांच्याशी हेल्पलाईनवरून तत्काळ संपर्क साधला. काही मिनिटात युवासैनिक सावर्डे रेल्वे स्थानकावर पोहोचले व त्या जखमी नागरिकासह त्याच्या पत्नीला डेरवण रुग्णालयात दाखल करुन त्यांना जीवदान दिले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सावंतवाडी दिवा पॅसेंजरमधून शनिवारी नंदूरबार येथील शांताराम मुकणे व त्यांची पत्नी पार्वती मुकणे हे प्रवास करत होते.रेल्वे संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आली असता शांताराम मुकणे यांना कोणाचा तरी धक्का लागला आणि थेट रेल्वेमधून बाहेर फेकले गेले. सुदैवाने रेल्वे स्थानकाजवळच ते पडले. त्यामुळे काही प्रवाशांनी त्यांना तत्काळ पुन्हा रेल्वेत घेतले. त्याच रेल्वे डब्यातून राजापूर येथील शिवसैनिक ओंकार नारकर व मनोज सार्दळ हे प्रवास करत होते. मुकणे हे प्रचंड जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून व नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या दोन्ही शिवसैनिकांनी तत्काळ चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख खताते यांच्याशी युवासेना हेल्पलाईनवर संपर्क साधला.युवासेना तालुकाप्रमुख खताते यांनी सावर्डे येथील युवासेना उपतालुकाप्रमुख सागर सावंत यांच्याशी संपर्क साधून तातडीने सावर्डे रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या सूचना दिल्या. सावंत यांनी सहकारी भूपेश सावर्डेकर व रुपेश घुले यांना बरोबर घेऊन सावर्डे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत दिवा पॅसेंजर स्थानकावर धडकली होती. नंदूरबारमधील जोडप्याला शोधून काढले व स्वत:च्या गाडीतून थेट डेरवण रुग्णालयात आणून दाखल केले.विशेष म्हणजे हे जोडपे कोण? कुठून आले? नाव काय? हे युवासैनिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर समजले. जात, धर्म बाजूला ठेवून एका फोनवर युवक काम करत होते व त्या जोडप्याला जीवदान दिले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका जोडप्याला जीवदान दिल्याबद्दल युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.