जनशताब्दी एलएचबी डब्याची
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून नियमित धावणाऱ्या दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेले एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, दि.१० जूनपासून जनशताब्दी एक्स्प्रेस एलएचबी या नवीन आधुनिक डब्यांची धावणार आहे.
पेन्शन अदालत
रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र, पणजी यांनी दि.२१ जून रोजी सकाळी ११ वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र, पणजी यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. निवृत्तीधारकांनी आपले अर्ज शिवकुमार वर्मा, लेखाधिकारी यांचे नाव पाठवावीत.
डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
आरवली : आरवली ते नाचरेवाडी हा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. पंचक्रोशीवासीयांनी डांबरीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करून, त्याचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.