शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाचलमधून सौरदिव्यांचा प्रकाश झालाय गायब

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

निकृष्ट काम : तीन महिन्याच्या आत दिवे बंद

पाचल : सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, यासाठी शासन अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेद्वारे पाचल (ता. राजापूर) गावात सौरदिवे बसवण्यात आले. मात्र, हे सौरदिवे इतके निकृष्ट होते की, दिवे बसवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आतच ते बंद पडले आहेत. गावात प्रकाश पडावा, यासाठी रात्रीच्या वेळी भीती व धोका वाटू नये, म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मोक्याच्या जागी हे सौरदिवे बसवण्याऐवजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापल्या हुकमी मतदारसंघात बसवले आहेत. दिवे बसवल्यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आपल्यासाठी बरेच काही तरी करत आहेत, असे सुरुवातीला मतदारांनासुद्धा वाटू लागले. परंतु हळूहळू सत्य बाहेर येऊ लागल्याने ग्रामस्थांचा संताप वाढू लागल्याचे सर्वत्र चित्र मिळत आहे. ग्रामपंचायतीने दिवे खेरदी करताना खात्रीलायक पुरवठा करणाऱ्या कंपनीला टेंडर द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. निकृष्ट दिवे खरेदी करण्यात आले. टेंडर मंजूर करताना अर्थकरण दडल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या रकमेची खरेदी दाखवून निम्म्या भागात खरेदी करण्यात आली. त्यामुळे या सौरदीप मालिकेतील बॅटरी हलक्या स्वरुपाची, तर सौरउष्णता खेचून घेणारी प्लेट एकदम निकृष्ट असल्याने हे सौरदिवे लवकर खराब झाले आहेत. पाणलोट विकास कार्यक्रमातून खरेदी करण्यात आलेल्या सौरदिवे खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक दिवे १५ दिवसांच्या आत बंद पडले आहेत. खरेदी खरेतर कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव, सदस्य यांना मार्गदर्शन करणारे कृषी खात्याचे कर्मचारीसुद्धा या बोगस खरेदीत समाविष्ट झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी कधीही चुकीच्या कामांना अथवा चुकीचे काम करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट चुकीचे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे एका चुकीच्या निर्णयाला समर्थन मिळाल्याने सौर दिव्यासारखी मौल्यवान योजना अखेरची घटका मोजत आहे. एका बाजूस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तर दुसरी बाजूला पाणलोट अध्यक्ष, कमिटी व अधिकारी अशा दोन्ही बाजू भ्रष्टाचारात सहभागी आहेत. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)