रत्नागिरी : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादातून सख्ख्या भावाला व भावजयीला कोयतीचे वार करून गंभीर जखमी करणाऱ्या नंदकुमार गणपत पेडणेकर (वय ५७, रा. दाभोळे, ता. संगमेश्वर) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला एक हजार रुपये दंडही करण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. ३ आॅगस्ट २०१२ रोजी संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे बाजारपेठेत ही घटना घडली होती.आरोपी नंदकुमार पेडणेकर व अरुण गणपत पेडणेकर (६०) यांच्यात वडिलोपार्जित घर व जमिनीवरून वाद आहेत. ३ आॅगस्ट २०१२ रोजी दुपारी अडीच वाजता अरुण पेडणेकर यांची पत्नी मनीषा यांनी सामायिक घराच्या पडवीतील दोरीवर साडी सुकत घातली. त्याचे निमित्त झाले व दोन्ही कुटुंबीयांत वाद उफाळला. त्यातून नंदकुमार पेडणेकर याने घरातील फरशी आणून अरुणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाल्यावर दांड्याने हल्ला केला. त्यानंतर घरातील कोयती आणून अरुण यांच्या दोन्ही खांद्यावर गंभीर दुखापती केल्या. त्यावेळी पतीला सोडविण्यास आलेल्या मनीषा यांच्यावरही त्याने कोयतीने वार केला. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान ३०७, ३२३, ३२४, ५०४ सह ३४ कलमान्वये नंदकुमार व त्याची पत्नी नम्रता यांच्याविरुद्ध गुुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक व्ही. बी. शेट्ये व हवालदार एल. के. शिवगण यांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आरोपी नंदकुमार पेडणेकर याला भारतीय दंडविधान ३०७ ऐवजी गंभीर दुखापत केल्याचा ठपका ठेवत ३२५ अन्वये दोषी ठरविले. तीन वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)दोन्ही पक्षाचे दहा साक्षीदार तपासलेयाप्रकरणी प्रमुख व जिल्हा न्यायाधीश यु. बी. डेबडवार यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार व आरोपी पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. दोन्ही बाजंूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी नम्रता पेडणेकर यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित
By admin | Updated: July 2, 2015 00:11 IST