शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना मदत करू

By admin | Updated: February 26, 2017 00:13 IST

रवींद्र वायकर : म्हाडा कला - क्रीडा महोत्सव तरंग २०१७

दापोली : या क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी शासनामार्फत आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोली येथे दिली. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही वायकर यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांनी आयोजित केलेल्या ‘म्हाडा कला व क्रीडा महोत्सव तरंग २०१७’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सचिव बी. एन. बास्टेवाड, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, दापोलीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव उपस्थित होते. कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. कोकणात समुद्रकिनारे, किल्ले तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन वृध्दीसाठी शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे वायकर यांनी सांगितले. दापोलीतील नवानगर झोपडपट्टीसाठी म्हाडाच्या माध्यमातून सर्व सुखसोयींनी समृध्द असलेली घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी म्हाडा व प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचे वायकर म्हणाले. तर काँग्रेसचं नावं न घेता त्यांनी शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जे-जे मदत करतील त्यांची मदत शिवसेना घेईल, असं सांगितलं. कोण मदत किती करतयं, त्याचे राजकीय समिकरणे सुरु आहेत. मुंबईत शिवसेनाच हवी असे सर्वसामान्य मुंबईकरांना वाटत आहे, मतदारांनी सेनेला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मुंबईत सेनेचाच महापौर असेल, असे ते म्हणाले.कोकण समृद्धीस सरकार कटिबद्धचपुढील काळात कोकणचा विकास पर्यटनातून करण्यासाठी प्रयत्न करू गोव्याकडे जाणारा पर्यटक कोकणात वळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, या पूर्वीच्या सरकारने कोकण पर्यटनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोकण पर्यटन मागासले आहे. इतर प्रदेशांच्या तुलनेत कोकण प्रदेश खूपच सुंदर आहे, कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे ते टिकवणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोकण पर्यटनातून समृद्ध कोकण बनविण्यासाठी युतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.