शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरातून निघाला तो थेट द्वारकेत पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:47 IST

Religious Places Ratnagiri-गुहागर तालुक्यातील देवघर येथील १८ वर्षीय अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा सायकलवरून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने आई-वडिलांचा जीव मात्र काळजीने कासावीस झाला. कोठेही त्याचा पत्ता न लागल्याने त्यांनी गुहागर पोलीस स्थानकही गाठले आणि शुक्रवारी सकाळी अथर्व गुजरातमधील द्वारकेत सुखरूप असल्याचा फोन आला आणि त्याच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. कृष्णभक्तीपोटीच तो तिथंपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे १८ वर्षाच्या युवकाचा घरी न सांगताच सायकलने प्रवास मुलगा सुखरूप असल्याचे कळता आई-वडिलांना आनंद

गुहागर : तालुक्यातील देवघर येथील १८ वर्षीय अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा सायकलवरून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने आई-वडिलांचा जीव मात्र काळजीने कासावीस झाला. कोठेही त्याचा पत्ता न लागल्याने त्यांनी गुहागर पोलीस स्थानकही गाठले आणि शुक्रवारी सकाळी अथर्व गुजरातमधील द्वारकेत सुखरूप असल्याचा फोन आला आणि त्याच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. कृष्णभक्तीपोटीच तो तिथंपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.देवघर भाग्यनगर येथे राहणारे जितेंद्र रामदास गोंधळेकर सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आरजीपीपीएल वसाहतीच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अथर्व हा बारावीत शिकत आहे. ३१ मार्चला सकाळी अथर्व सायकल घेऊन घराबाहेर पडला. काही तास परत न आल्याने आजूबाजूला मित्राकडे किंवा अन्य ठिकाणी गेला आहे का, याचा शोध घेण्यात आला.

रात्री उशिरा गुहागर पोलीस स्थानकात अथर्व बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. अथर्व हा कृष्णभक्त आहे. लहानपणापासून त्याला जप करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे याची ओढ आहे. त्याचे मन कृष्णभक्तीत रमत असल्याने अनेक वेळा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जप करण्याची त्याची सवय लक्षात घेऊन त्याची पोथी जपाची माळ आदी साहित्य सोबत घेऊन गेल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.शुक्रवारी सकाळी अचानकपणे द्वारका (गुजरात) येथील इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने अथर्वच्या घरी फोन करून तो सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर अथर्वच्या आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो तेथील व्यवस्थापनाच्याच ताब्यात आहे. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली. तातडीने अथर्वला घरी आणण्यासाठी आई-वडील व नातेवाईक द्वारका गुजरात येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. याबाबत गुहागर पोलिसांशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी कृष्णभक्तीत अथर्व घरातून बाहेर पडला असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्ष तो आल्यावर नक्की कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.गुगलवरून सर्चअथर्वला लहानपणापासून कृष्ण भक्तीची गोडी लागलेली आहे. तो कायम कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. त्याने घरातून बाहेर पडणाऱ्यापूर्वी गुगलवरून द्वारकेचे ठिकाण शोधले होते. त्याचबरोबर त्याने तिथपर्यंत जाण्याचा मार्गही पाहिला होता. त्यामुळे तिथे गेल्याचा अंदाज बांधण्यात आला होता.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेRatnagiriरत्नागिरी