शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

‘जैतापूर’साठी प्रसंगी सत्ता सोडू

By admin | Updated: April 15, 2015 01:14 IST

विनायक राऊत : प्रकल्पाविरोधात शिवसेना व्यापक लढा उभारणार

राजापूर : फ्रान्ससमवेत झालेला करार केंद्र सरकारला महत्त्वाचा वाटत असला तरी आम्हाला जैतापूरवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध लढणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिली आहे. आता तर निर्णायक लढाईची वेळ आली आहे. हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत घालवून लावण्यासाठी यापुढे व्यापक स्वरूपाचा लढा उभारून त्यासाठी प्रसंगी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल, पण माघार घेणार नाही, असा हल्ला शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चढविला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत तेथील अरेवा कंपनीशी एल अ‍ॅण्ड टी कंपनीचा सामंजस्याचा करार घडवून आणला होता. त्याचे प्रकल्प परिसरात जोरदार पडसाद उमटले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा शिवसेना हा सत्तेतील भागीदार असून, भाजपने जैतापूर प्रकल्पाला पोषक भूमिका घेतल्याने शिवसेना संतप्त झाली. त्यानंतर सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी साखरीनाटे येथे जाऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छिमारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छिमार नेते अमजद बोरकरही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्प येणार, याची कुणकुण लागल्यापासून येथील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांनी प्राणपणाने प्रकल्पाविरुद्ध लढा सुरूच ठेवला आहे. त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला. यापूर्वी अनेक जनआंदोलनात सक्रिय सहभागही नोंदवला. मागील सरकारप्रमाणेच विद्यमान केंद्र सरकारने जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. तसेच फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी सामंजस्य करार केल्यामुळे आता या प्रकल्पातील अडथळे दूर होऊन अणुऊर्जा प्रकल्पाला लागणारे अभियांत्रिकी उत्पादन देशातच निर्माण होणार आहे, तर अरेवा कंपनीकडून अत्याधुनिक फोर्जिंग तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या त्या करारानंतर शिवसेना आक्रमक बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. फ्रान्सशी झालेला करार सरकारला मोठा वाटत असला तरी आम्हाला प्रकल्पग्रस्त मोठे वाटतात. त्यांचे जीवन आमच्यासाठी मोलाचे आहे. म्हणूनच आम्ही आजवर येथील प्रकल्पग्रस्तांसमवेत राहिलो आहोत आणि यापुढेही राहू, असा विश्वास खासदार राऊत यांनी दिला. आम्ही जैतापूरवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या हितासाठी प्रसंगी सत्ता सोडू, पण आता गप्प बसणार नाही, असे बजावत खासदार राऊत यांनी भविष्यात केवळ प्रकल्प परिसरच नाही तर गावागावांत जनजागृती करत जैतापूर प्रकल्पाविरुद्ध तीव्र लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार राजन साळवी यांनीही केंद्र शासनावर तुफान टीका केली. आमच्या भावी पिढीसाठी व त्यांच्या रक्षणासाठी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प इथून हटलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विजेचा तुटवडा जाणवत असेल तर कोयनेच्या चौथ्या टप्प्याला गती द्या, अशीही त्यांनी मागणी केली. यापुढे आमचे आंदोलन याहून अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला. मच्छिमारांच्या हितासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी अमजद बोरकर यांनी केली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध घोषणा दिल्या. या बैठकीला पंचायत समितीचे सदस्य दीपक नागले, रेखा कोंडेकर, राजन कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)