शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावर्षी कोरोनाने, यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 13:34 IST

मेहरुन नाकाडे रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या ...

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे कार्तिकी एकादशीनिमित्त एकही गाडी पंढरपूरला जाऊ शकलेली नाही. यामुळे रत्नागिरी विभागाच्या उत्पन्नावर परिणाम तर झालाच शिवाय भक्तांचाही हिरमोड झाला.

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने शासकीय नियमावली शिथिल केल्यामुळे भाविकांनी पंढरपूरला जाण्याचे निश्चित केले होते. खेड, दापोली, देवरुख, लांजा आगारातून बारा जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे एसटी पाठविणे शक्य नसल्याने गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी भरलेले पैसे रत्नागिरी विभागाकडून परत देण्यात आले आहेत. दोन वर्षांत पंढरपूर यात्रेसाठी बसेस जाऊ न शकल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

एसटीला २०१९ ला ६२ लाखांचे उत्पन्न

- २०१९ साली कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी विभागातून एकूण १२० जादा गाड्या पंढरपूरला सोडण्यात आल्या होत्या.- विभागातून १२० जादा गाड्यांमुळे ६२ लाख १५ हजार ३० रुपयांचे उत्पन्न विभागाला लाभले होते.

- २०२० साली कोरोनामुळे तर यावर्षी एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूरसाठी एकही गाडी जाऊ शकलेली नाही.

पावसाळ्यात शेतीची कामे असल्याने एकादशीसाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही. परंतु, कार्तिकी एकादशीला आवर्जून जातो. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे जाता आले नाही, यावर्षी जाण्याचे निश्चित केले होते. पैसेही भरले होते. परंतु, एसटी कर्मचारी संपामुळे एसटीच बंद असल्याने यावर्षीही माउलीचे दर्शन शक्य झाले नाही. - रोहित पाटील, देवरुख

कोरोनाचे विघ्न बऱ्यापैकी सरल्यामुळे माउलीच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह जाण्याची तयारी केली होती. ऐनवेळी एस.टी. कर्मचारी कामबंद आंदोलनामुळे एसटीच बंद आहे. त्यामुळे श्री माउलीच्या दर्शनाला जाण्याची संधी हुकली. परंतु, एसटी सुरू होताच नक्की जाणार आहे. लवकर संप मिटावा, अशी अपेक्षा आहे. - कल्पेश माने, राजापूर

पैसे परत केले

कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला जात असतात. कोरोनामुळे गतवर्षी शक्य झाले नाही. यावर्षी बारा जादा गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले होते. आगाऊ रक्कमही भरली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षणासाठी भरलेली रक्कम परत करण्यात आली. - प्रमोद जगताप, प्रभारी विभागनियंत्रक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPandharpurपंढरपूरST Strikeएसटी संपcorona virusकोरोना वायरस बातम्या