शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जवान जयेंद्र तांबडे यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:14 IST

चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.मंगळवारी रात्री उशिराने ताम्हणमळा येथे जयेंद्र तांबडे यांचे पार्थिव आणण्यात आले. तांबडे ...

चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.मंगळवारी रात्री उशिराने ताम्हणमळा येथे जयेंद्र तांबडे यांचे पार्थिव आणण्यात आले. तांबडे परिवाराला सैनिकी परंपरेचा वारसा लाभला आहे. तांबडे यांचे चुलत बंधूही सैन्यात आहेत. त्यांनी व त्यांच्या परिवाराने या प्रसंगाला धीराने तोंड दिले. बुधवारी सकाळी ११ वाजता ताम्हणमळा येथील स्मशानभूमीत जवान जयेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा निकम, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्ययात्रेवेळी ‘जयेंद्र तांबडे अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. ताम्हणमळा स्मशानभूमीत रत्नागिरीहून आलेल्या पोलीस पथकाने सलामी दिली. यानंतर पोलीस व प्रशासनातर्फे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाला हे वीरमरणच आले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आणि श्रध्दांजली वाहिली.