शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलन, शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:42 IST

रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलनअतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे नुकसान

रत्नागिरी : शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे भूस्खनाचे प्रकार सुरूच आहेत. २००६ मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन सुमारे ४-५ एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायती देखील उद्ध्वस्त झाली आहे. भूस्खलनाच्या धोक्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच करणे सोडून दिले आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी त्यावेळी तातडीने या भागाची पाहणी केली होती. भूवैज्ञानिक स्तरावरूनही या प्रकारची दखल घेण्यात आली होती. रिंग लॅण्ड स्लाईड प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करून उपाययोजनेसाठी पाठवण्यात आला होता.सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपयोजना झाली काँक्रीटचा धूपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे १५ ते २० लाख खर्च झालेत. मात्र, पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.

अतिवृष्टीमुळे सुमारे १०० फूट लांब आणि १५ ते २० फूट उंच जमीन खचली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. याठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, आणि आता भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून नुकसान झाले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी